By  
on  

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सेन्सॉरमुक्त चित्रपटांनाही प्रवेश

पुणे फिल्म फांऊडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राचे आर्थिक नुकसान झाले आहे. मनोरंजनसृष्टीसुद्धा त्याला अपवाद नाही. गेले अनेक वर्ष मराठी चित्रपटांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ ‘पिफ’ ने उपलब्ध करून दिले आहे. महोत्सवाच्या नियमावली प्रमाणे सहभागी चित्रपटांना (१जानेवारी ते ३१डिसेंबर २०२०) मध्ये सेन्सॉर संमत असणे आवश्यक आहे. परंतु कोरोनाच्या फटक्यामुळे आणि कमी कालावधीमुळे ३१ डिसेंबर २०२०च्या आत सेन्सॉर मिळणे शक्य वाटत नाही. त्यामुळे या वर्षात निर्माण झालेल्या  चित्रपटांचे नुकसान होऊ नये तसेच त्यांना स्पर्धेसाठी पात्र होता यावे यासाठी यंदा हे व्यासपीठ उपलब्ध करून देताना ‘सेन्सॉर मिळालेल्या’ व ‘सेन्सॉर न मिळालेल्या’ दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना प्रवेशाची सवलत मिळावी यासाठी ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्याकडे विनंती केली होती. ही विनंती मान्य करत जब्बार पटेल यांनी २०२० या वर्षाकरिता ‘सेन्सॉर मिळालेल्या’ व ‘सेन्सॉर न मिळालेल्या’ अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त सहभागी होण्याची मुभा दिली आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीच्या हितासाठी ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले हे कायमच प्रयत्नशील राहिले आहेत. कोरोनाकाळातही चित्रपट महामंडळाकडून चित्रपटकर्मी व तंत्रज्ञ यांना जास्तीजास्त मदत करण्याचा प्रयत्न मेघराज राजेभोसले यांनी केला होता. आतासुद्धा पिफ महोत्सवात सहभागी  होऊ इच्छिणाऱ्या चित्रपटांसाठी त्यांनी सवलत उपलब्ध करून दिली आहे. ही सवलत उपलब्ध करून देताना चित्रपटांकडून खालील बाबींची पूर्तता करण्याचे आश्वासन मेघराज राजेभोसले यांनी ‘पुणे फिल्म फांऊडेशन’ला दिले आहे.

१) सहभागी चित्रपटाचे शीर्षक व बॅनर हे ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’कडे नोंदणीकृत असेल.

२) संबधित चित्रपटाची निमिती ही सन २०२०मध्येच  झाली आहे याची लॅब अथवा स्टुडीओकडून खातरजमा करून संबधित चित्रपटाची DCP प्रिंट दाखवण्यास तयार असल्याचे प्रमाणित करू.

३) सहभागी होणाऱ्या चित्रपटांचे  निर्माते, दिग्दर्शक महोत्सवाचे नियम काटेकोरपणे पाळतील.

४) यावर्षी सहभागी अथवा प्रवेश नोंदणी केलेल्या चित्रपटांना पुढील वर्षी २०२२ला सहभागी होता येणार नाही याची पूर्वसूचना देऊ.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive