ललित प्रभाकर स्टारर ‘टर्री' सिनेमाला दिग्गजांकडून मिळाल्या शुभेच्छा

By  
on  

एखादं क्षेत्र आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजवत असताना इतर क्षेत्राचीही जाण असणारी मंडळी क्वचित आढळतात. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यापैकीच एक. आपल्या बेधडक स्वभावाने राजकारणाचं मैदान गाजवणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राजकारण आणि समाजकारणासोबत आपली कला व साहित्याची आवड नेहमीच टिकवून ठेवली आहे. याच आवडीतून त्यांनी वेळात वेळ काढून ‘टर्री या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमची सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे या चित्रपट निर्मिती मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मुलगा अक्षय आढळराव पाटील यांचाही सहभाग आहे.

याप्रसंगी ‘टर्री' चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत त्यांनी चित्रपटाबद्दल जाणून घेतलं. तसेच आपल्या आवडत्या चित्रपटांबाबत बोलताना ‘टर्री’ चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकरच्या ‘स्माईल प्लिज’ आणि ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातील कामाचेही कौतुक केले. ‘मी बेधडक वृत्तीने काम करीत आजवर यशस्वी झालो आहे, 'टर्री' हा पण बेधडक आहे त्यामुळे तो यशस्वी होणारच’ असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

जबरदस्त ऊर्जा असलेला, काहीही करण्याची धमक असलेला तरुण म्हणजे 'टर्री'. मराठीतला डॅशिंग स्टार ललित प्रभाकर 'टर्री' चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून लवकरच इतर कलाकारांची निवड होणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट प्रॅाडक्शनने ‘प्रियामो एन्टरटेन्मेंट’च्या सहयोगानं 'टर्री'ची निर्मिती केली आहे. प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील आणि विक्रम धाकतोडे या सिनेमाचे निर्माते आहेत. महेश रावसाहेब काळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.

Recommended

Loading...
Share