अमृता सुभाषच्या ‘द बूथ’ या शॉर्ट फिल्मला मिळाला हा मान

By  
on  

अमृता सुभाष एक गुणी अभिनेत्री आहे याबाबत कुणाचंच दुमत नाही. अमृता नाटक, सिनेमा, वेबसिरीज, शॉर्टफिल्म या अनेक माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आताही अमृता ‘द बूथ’ या शॉर्टफिल्ममधून समोर येते आहे. या शॉर्टफिल्मला खास मान मिळाला आहे.

 

 

याबाबत बोलताना अमृता सुभाष म्हणते, ‘फिल्म कंपॅनिअनच्या सर्वोत्तम समिक्षकांनी निवडलेल्या सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत द बूथ या माझ्या लघुपटाची निवड झाली आहे. खूप आनंद झाला कारण इतर सर्वोत्तम सिरिजमधे हा एकमेव लघुपट आहे. माझी सहकलाकार पर्ण पेठे, दिग्दर्शक रोहीन नायर, निर्माता विक्रमादित्य मोटवाने, छायालेखक स्वप्नील सोनावणे आणि सूत्रधार टीया सबॅस्टीन यांची मी ऋणी आहे फिल्म कंपॅनिअन व अनुपमा चोप्राचे आभार!उमेश विनायक कुलकर्णीचे विशेष आभार कारण त्याच्यामुळे या लघुपटाचा दिग्दर्शक रोहीन आणि माझी ओळख झाली’  अमृता या शॉर्टफिल्ममध्ये सिक्युरिटी गार्डच्या भूमिकेत दिसते आहे.

Recommended

Loading...
Share