By  
on  

मिताली-सिद्धार्थच्या घरात हा सदस्य आहे सर्वात जास्त Possessive

मिताली-सिद्धार्थ ही जोडी अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली. मोठ्या धुमधडाक्यात पुण्यातील ढेपेवाडा येथे ही जोडी विवाहबंधनात अडकली. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे हा लग्नसोहळा बहुचर्चित होता. यानंतर ही जोडी क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी एका रिसॉर्टलाही गेली होती. तेथील खास फोटोही या जोडीने चाहत्यांशी शेअर केली आहे.

 

 

पण आता मात्र सिद्धार्थने एक हटके व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तो आणि पेट डॉग डोरा दिसत आहेत. या व्हिडियोत सिद्धार्थ मांजराचा आवाज काढताना दिसत आहे. त्याच्या राग येऊन डोरा त्याच्यावर चिडतानाही दिसत आहे. या दोघांची ही क्युट जुगलबंदी चाहत्यांना चांगलीच आवडते आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive