By  
on  

या कलाकाराने हटके पद्धतीने केलं लेकीचं बारसं, पाहा व्हिडियो

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत श्रेयसची भूमिका साकारणारा कलाकार म्हणजेच अभिनेता सचिन देशपांडे याने २४ जानेवारी रोजी एक पोस्ट शेअर करत बाबा झाल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. यावेळी एक खास मेसेज शेअर करत सचिनने ही बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. पण आता सचिन आणखी एका पोस्टमुळे प्रकाश झोतात आला आहे. सचिनने एक व्हिडियो पोस्ट केला आहे.

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, सचिनने मुलीच्या नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. ‘नमस्कार, सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे, कुठलाही समारंभ करण्यावर अनेक बंधनं आली आहेत, पण त्याच बरोबर सोहळे, समारंभ साजरा करण्याच्या नवनवीन कल्पना ही येऊ लागल्या आहेत. म्हणूनच आमच्या मुलीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा करण्याचा एक वेगळा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या लेकीला आशीर्वादही नक्की द्या’. मीरा असं सचिनच्या लेकीचं नाव आहे. सध्याची परिस्थिती पाहता सचिनच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive