By  
on  

मराठी सिनेमा अनुदानाच्या संमतीसाठी IMPPA चं सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र

मराठी सिनेमांना आणि सिनेउद्योगाला नवी भरारी मिळण्यासाठी अनुदानाची आवश्यकता असते. म्हणूनच इंडीयन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्सच्या वतीने सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र सरकार अमित देशमुख यांना अनुदानाला मान्यता देण्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी यासंदर्भात लेखी पत्र देण्यात आले आहे. 

 IMPPA चे अध्यक्ष टीपी अग्रवाल यांनी गेल्या ३ वर्षापासून मराठी सिनेमाला तुटपुंजं अनुदान मिळण्यात येत असल्याने वाढलेल्या अडचणींचा मुद्दा या पत्रात ठळक केला आहे. अपु-या अनुदानामुळे निर्मात्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. 

 

 


 

या निर्मात्यांनी पत्राद्वारे तातडीने  मराठी सिनेमांच्या  अनुदानाच्या विषयावर लक्ष घालण्यात यावे, असे सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive