By  
on  

‘टाईमपास 3’ सिनेमाभोवती वादाचं वलय

टाईमपास आणि टाईमपास 2 नंतर टाईमपास 3 ची चर्चा होती. पण टाईमपास 3 या सिनेमाभोवती वादाचं वलय वाढताना दिसतं आहे. या सिनेमाच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यात वाद झाला आहे. सिनेमाच्या हक्कांवरुन हा वाद झाल्याचं समजत आहे. 
एका प्रथितयश वृत्तापत्राने दिलेल्या बातमीनुसार मौर्य फिल्मचे राजकुमार ढाकने यांनी ‘टाईमपास ३’चे सर्व अधिकार कायदेशीररीत्या निर्मिती संस्थेचे असल्याचा दावा केला आहे.

तर रवी यांनी ‘हे आरोप खोटे असून ‘टाईमपास’ आणि ‘टाईमपास २’चेही हक्क माझ्याकडे आहेत त्याच प्रमाणे टाईमपास 3 चेही आहेत’ हे सांगितलं आहे. या सिनेमात हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive