By  
on  

ज्येष्ठ लोककलावंत,, भारुडरत्न निरंजन भाकरे यांचं करोनाने निधन

 प्रसिद्ध लोककलावंत ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे  यांचे शुक्रवारी करोनाने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.  मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुड सादरीकरणाने राज्यभर  ज्येष्ठ लोककलावंत निरंजन भाकरे यांना अमाप प्रसिध्दी मिळाली. ‘व्यसनमुक्ती पहाट’ कार्यक्रमातून चार वर्षे त्यांनी जनजागृती केली. त्यांनी ‘मराठी बाणा’, ‘लोकोत्सव’ कार्यक्रम गाजविले. टीव्ही शो, वेरूळ-अजिंठा महोत्सव, लोकगाथा अशा कार्यक्रमात भाकरे यांचे भारुड सादरीकरण गाजले होते. सोंगी भारुडासाठी भाकरे राज्यभर परिचित झाले होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive