By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील फोटोग्राफर सुधाकर मुणगेकर यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीतील सिनेछायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटपर्यंत ते फोटोग्राफर म्हणूनच कार्यरत होते. मुणगेकर यांनी त्यांच्या सिनेकारकिर्दीत अनेक मराठी तसेच बॉलिवूडमधील प्रसिध्द सिनेमांसाठी स्थिर चित्रण केले. 

बॉबी, सत्यम शिवम सुंदरम, प्रेमरोग, नदियों के पार, उपहार, अखियों कें झरोंके सें, हिना, गीत गाता चल ह्यांसारख्या 150 हून ्अधिक सिनेमांसाठी त्यांनी काम केलं. 

देव आनंद, दिलीप कुमार, राजश्री प्रोडक्शन यांसारख्या बड्या नामवलीसह त्यांनी काम केलं. तर मराठीत विजय केंकरे, सई परांजपे , श्रीकांत ठाकरे, कुमार सोहोनी या दिग्गजांसह काम केलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive