By  
on  

प्रख्यात संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचं निधन

ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचे नागपुरात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि नागपुरात आपल्या मुलासोबत राहत होते. मध्यरात्री 1 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील.  विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून त्यांनी आपला ठसा कलाविश्वात उमटवला. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.

पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी ्हयांना राम लक्ष्मण यांनी संगीत दिलं. राजश्री प्रो़क्शनच्या बॅनरचे सिनेमे आणि संगीतकार म्हणून राम लक्ष्मण हे समीकरण ठरलेलं होतं.  ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive