By  
on  

अभिनेत्री स्नेहा चव्हाण झळकणार ‘बॅक टू स्कूल’ या सिनेमात

‘लाल इश्क’ या सिनेमाच्या आणि हृदयात वाजे समथिंग या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहा चव्हाण. स्नेहा आता आगामी  'बॅक टू स्कुल' या सिनेमात झळकणार आहे. रील शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली आहे. रंगसंस्कार प्रॉडक्शनच्या 'बॅक टू स्कुल' या सिनेमाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले असून पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sneha (@mesnehachavan)

 

शुभांगी सतीश फुगे आणि सतिश महादु फुगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे हे कलाकार झळकणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive