‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने आणि ‘पांडुरंग’ गाण्यातून सुरू होतेय ‘कडक भक्ती’ची नवी वाटचाल'

By  
on  

“मायेचे माहेर, तुझीच पायरी…होई रे कैवारी पांडुरंगा....”
पांडुरंग आणि त्याची पंढरी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी हक्काचं माहेर आहे यात काही शंका नाही. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्यामुळे ‘आषाढी एकादशी’ला अनन्य साधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटले की प्रथम डोळ्यांसमोर येते ती विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होणारी पंढरपूरची वारी. या पावन दिवशी ‘कडक एंटरटेनमेंट’ अंतर्गत सुरु असेलेले आणि मराठी प्रेक्षकांना त्यांच्या हक्काच्या भाषेत मनोरंजन करणारे ‘कडक भक्ती’ या युट्युब चॅनेलच्या नवीन उपक्रमाची सुरुवात झाली आहे.

वेगवेगळे विषय प्रादेशिक भाषेत मांडून आणि वेगवेगळ्या जॉनरच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे असे ‘कडक मराठी’च्या नरेंद्र फिरोदिया, श्रुती मुनोत आणि मयुरी मोरे- मुनोत यांनी ठरवले आणि तिच नवीन वाटचाल आज आषाढी एकदशीच्या निमित्ताने सुरु होतेय आणि ती नवी वाटचाल म्हणजे भक्तीपर विशेष कार्यक्रमासाठी असलेलं त्यांचं स्वत:चं असं स्वतंत्र व्यासपीठ ‘कडक भक्ती’. विठू माऊलीच्या नामाने आणि आषाढी एकादशीचं औचित्य साधून ‘कडक भक्ती’ चॅनेलवरील पहिलं वहिलं भक्ती गीत ‘पांडुरंग’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

कडक एंटरटेनमेंट’ आणि ‘कोल्हापूर फिल्म कंपनी’ निर्मित ‘पांडुरंग’ या भक्ती गीताची संकल्पना मनोरंजनसृष्टीतील स्वप्नील संजय मुनोत, अक्षय मुनोत आणि
‘पोश्टर बॉय’ उर्फ सचिन सुरेश गुरव यांची आहे. ‘कडक भक्ती’चं हे पहिलं भक्तीगीत गीतकार गुरु ठाकूर यांनी रचले आहे. या भक्ती गीताला विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिले आहे तर कृष्णा बोंगाणे यांनी ते गायले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी प्रथमेश रांगोळे यांनी उत्तमरित्या पेलली आहे तर संकलन वैभव पाटील आणि डिझाईन्स सचिन सुरेश गुरव यांनी केले आहे. या भक्तीगीताच्या निमित्ताने सचिन सुरेश गुरव यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

भारत हा संस्कृती प्रिय देश आहे आणि आपला महाराष्ट्र तर संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. म्हणजेच संस्कृतीचा उत्तम वारसा आपल्याला लाभला आहे. भारतातल्या विविध प्रादेशिक भाषांमधून विविध संस्कृतीची भक्तिगीते तयार करून त्या-त्या प्रादेशिक भाषांमध्ये देखील ती प्रस्तुत करण्याचा ‘कडक एंटरटेनमेंट’चा मानस आहे आणि याच विचारातून ‘कडक भक्ती’ प्रेक्षकांच्या भेटीस आले. या व्यासपीठावर प्रेक्षकांना फक्त भक्तिगीते ऐकायला- पाहायला मिळणार आहेत.

‘अहमदनगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेचे अध्यक्ष आणि प्रायोजक, ‘सोहम’, ‘अनुष्का मोशन पिक्चर्स’, ‘लेट्सअप’ प्रोजेक्ट्सचे प्रमुख, ‘अगंबाई अरेच्चा २’ आणि ‘ट्रिपल सीट’चे निर्माते आणि ‘लेट्सफ्लिक्स ओटीटी’चे प्रमुख उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे 'कडक मराठी' या युट्यूब चॅनलचे पण संस्थापक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली  श्रुती अक्षय मूनोत आणि मयुरी स्वप्निल मूनोत 'कडक मराठी' च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवणार आहेत.

 

 

 

 

 

सध्याच्या महामारीच्या काळात आपल्या सर्वांना जाणवलं की वाईट काळातून सुखरुप बाहेर पडण्यासाठी आपल्याला भक्तीची साथ हवी असते. भक्तीमधून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पॉझिटिव्ह व्हाईब्स पोहचवण्यासाठी ‘कडक एंटरटेनमेंट’ने ‘कडक भक्ती’ हा उपक्रम सुरू करण्याची योजना केली. आपल्या भारतात अनेक भाषा आहेत आणि त्या प्रत्येक भाषेत मनोरंजनात्मक, प्रेक्षकांशी जोडता येईल अशा विविध उपक्रमांचा विचार केला पाहिजे असं स्पष्ट मत ‘कडक मराठी’च्या संस्थापिकांचे आहे. ‘कडक भक्ती’ची सुरुवात तर झाली आहे आता लवकरच लहान मुलांसाठी विशेष असं व्यासपीठ, संगीत, इन्फोटेनमेंट इ.साठी देखील नवीन व्यासपीठ देखील सुरू होणार आहेत.
 

Recommended

Loading...
Share