ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास

By  
on  

ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात इसमाने लंपास केली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी दादर शिलाजी पार्क येथे घडला आहे. 

पार्काला फेरी मारल्यानंतर दमल्यामुळे मालपेकर नेहमीप्रमाणे कट्ट्यावर बसल्या होत्या. तेव्हा अनोळखी व्यक्ती वेळ विचारण्याच्या बहाण्याने  त्यांच्या समोर आला. मालपेकर यांच्याकडे घड्याळ नसल्याने तो निघून गेला, मात्र काही मिनिटांतच त्यांच्या पाठीमागे येऊन त्याने सोनसाखळी हिसकावली व समोरच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटरसायकलवरून फरार झाला. हा सर्व प्रकार अगदी क्षणार्धात घडला. यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच पोलिस घटनास्थळी हजर झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिस लवकरच चोराला पकडतील अशी माहिती ाहे.  

Recommended

Loading...
Share