By  
on  

अर्ध्या दिवसात 1 मिलीयन व्ह्युज मिळालेले 'आपली यारी' पहिले मराठी गाणे!

नादखुळा म्युझिक लेबलच्या आपली यारी गाण्याने विक्रम केला आहे. ह्या गाण्याला निव्वळ 12 तासांमध्येच 1 मिलीयन व्ह्युज मिळाले. 'मराठी इंडस्ट्रीतला मिलीयनियर म्युझिक डायरेक्टर' अशी ओळख असलेल्या प्रशांत नाकतीच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला गेला आहे. 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने गुरूवारी आपली यारी हे गाणे सोशल मीडियाव्दारे लाँच केले.  बॉलीव़ूड निर्माता निखील नमीत आणि प्रार्थना बेहेरे गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने  प्रार्थनाने निखील नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे आपली यारी हे गाणे नुकतेच सोशल मीडियाव्दारे रिलीज केले. फ्रेंडशीपडेच्या मुहूर्तावर आलेल्या ह्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “नादखुळा ह्या निखीलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशीप डे निमीत्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, ह्याचा मला आनंद आहे. निखीलची आणि माझी मैत्री खूप जूनी आहे. त्यामूळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा दुग्धशर्करा योग आहे.”

निर्माता निखील नमीत म्हणतात,”आपली यारी गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आणि ‘जगात लय भारी’ अशी आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमूळे आम्ही ह्या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देतोय. 12 तासांत गाण्याने 1 मिलीयनचा टप्पा गाठावा, ह्याचे पूर्ण श्रेय प्रशांतच्या सुरेल संगीताला जाते. ”

'आपली यारी' गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे. पहिल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतिक्षा थोरात हे दहा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.

प्रशांत नाकती गाण्याविषयी सांगतो, “मराठी चित्रपटांमध्ये आपण दोस्तीवरची गाणी पाहिली आहेत. पण  पहिल्यांदाच मराठीत म्युझिक लेबलचे मैत्रीवरचे गाणे आले आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की, हे गाणे ऐकल्यावर, प्रत्येकाला  आपल्या कॉलेजचे दिवस आणि, आपले जवळचे मित्र-मैत्रिण आठवतील. आम्ही दहा इन्फ्लुएन्सर्सवर हे गाणे चित्रीत केलंय. आणि मला अतिशय आनंद आहे की,  ह्या गाण्याने माझ्या इतर गाण्यांचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत.   सर्वात कमी वेळात 1 मिलीयन क्रॉस केलेले हे पहिले मराठी गाणे बनले आहे”

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive