By  
on  

प्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी आता राजकारणाची इनिंग सुरु केली आहे. या दोघांनीही आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागासाठी हे दोघे करणार काम करतील.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयात या दोघांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री आणि राष्ट्रवादी चित्रपट आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे  उपस्थित होते.  रघुवीर खेडकर हे 'अखिल भारतीय तमाशा परिषदे'चे अध्यक्ष आहेत. तर मंगला बनसोडे या परिषदेच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive