प्रसिध्द न्यट्र्शनिस्ट ऋजुता दिवेकर नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. आहारातील विविध पदार्थांचं , जिन्नसांचं महत्त्व व त्याचे शरीराला होणारे फायदे उलगडून सांगतात. करिना कपूरची न्यट्र्शनिस्ट म्हणून त्या प्रसिध्दी झोतात आल्या. त्यांची आहाराविषयक अनेक पुस्तकं प्रसिध्द आहेत. मात्र, रुजुता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांना पुरस्कार पाहिजे असेल तर अडीच लाख रुपये भरण्यास सांगितल्याचा गौप्यस्फोट नुकताच केला आहे.
रुजुता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं आहे, “एका मीडिया एजन्सीने मला प्रेरणादायी महिला म्हणून पुरस्कार देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी मला फक्त एक फॉर्म भरावा लागेल आणि २ लाख ५० हजार रुपये भरावे लागतील,” असे त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे. तर ही पोस्ट शेअर करत “गेल्या तीन वर्षात १०० पेक्षा अधिक पुरस्कारांच्या ऑफर मला मिळाली. प्रेरणादायी स्त्रीपासून ते अग्रगण्य पोषणतज्ज्ञ ते जागतिक आरोग्य तज्ञ इत्यादी. टीव्हीवर थोडावेळ झळकण्यासाठी, मॅग्झिनच्या कव्हर पेजसाठी, वर्तमानपत्रात आणि बऱ्याच गोष्टी या सगळ्यांची एक किंमत ठरलेली असते. बहुतेक पुरस्कार हे एक बिझनेस म्हणून दिले जातात,” असे कॅप्शन रुजुता दिवेकर यांनी दिले आहे.
त्यांच्या या पोस्टचं अनेक नेटक-यांनी कौतुक केलं आहे. प्रतिक्रीया दिल्या आहेत.यापैकी एक कमेंट ही बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आहे. कंगनाने ही ऋजुता यांना पाठिंबा देत त्यांचे कौतुक केले आहे. “मी खूप आधीच चित्रपट पुरस्कारांवर बहिष्कार टाकला आहे, मला आनंद आहे की तुम्ही सगळ्या स्त्रीयांच्यावतीने अशा फसवणुक करणाऱ्यांच्या विरोधात पुढे आला आहात,”
महत्त्वाचं म्हणजे इतर सेलिब्रिटी, आहारतज्ञ यांच्याप्रमाणे ऋजुता या आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन कुठलीच जाहिरात करत नाहीत. कुठल्याच प्रोडक्टला त्या प्रोमोट करत नाही. जे काही आहे ते आपल्या अनुभवातून स्पष्टपणे मांडतात. सोशल मिडीयावर त्यांना वन मिलीयन पेक्षा अधिक चाहते फॉलो करतात.