आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मोहिनी घालणाऱ्या गायिका सावनी रवींद्रला नुकताच कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सावनीने काही महिन्यांपूर्वी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत. ती लवकरच आई होणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. तसंच डोहाळे जेवणाचे गोड फोटोसुध्दा शेअर केले होते.
त्यावेळी माध्यमांशी बोलताना सावनी म्हणाली होती, ’माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणा-या बाळाने मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक आहे.’’