आज आंतरराष्ट्रीय युवा दिवस आहे. कोणत्याही देशाचं भविष्य म्हणून त्या देशातील युवा वर्गाकडे पाहिलं जातं. युवकांच्या समस्या त्यांच्यापुढील वातावरण याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अभिनेता भरत जाधव यांनी आजच्या दिवसाचं औचित्य साधत खास पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘तरुणपणी पाहिलेल्या स्वप्नांच्या नजरेतूनच आपण आयुष्याची वाटचाल करत असतो. आयुष्याच्या त्या वळणावर योग्य माणसं आपल्याला लाभली तर त्याहून उत्तम गोष्ट कुठलीच नसते. आजूबाजूला प्रलोभन दाखवणाऱ्या.. वाट चुकवणाऱ्या गोष्टी खूप आहेत. शॉर्टकट घेऊ नका. प्रामाणिकपणे कष्ट करा,निर्व्यसनी रहा यश तुमचंच आहे. आणि तसही तारुण्य हि शरिराची नाही मनाची अवस्था असते. मनाने तरुण असणाऱ्या सगळ्यांना युवा दिवसाच्या शुभेच्छा!’ यासोबतच भरत यांनी केदार यांच्यासोबतचा तरुणपणीचा फोटोही शेअर केला आहे.