इंडियन आयडन 12 चा ग्रँड फिनाले सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या पर्वाचा विजेता ठरलाय पवनदीप राजन. तर अरुणीता कांजीलाल आणि सायली कांबळे या टॉप 3 फायनलिस्ट ठरल्या. इंडियन आयडल या कार्यक्रमातून अनेक गायक-गायिकांचं करियर घडवलय. यातच आता फायनलिस्ट सायली कांबळेलाही चक्क सिनेमासाठी गाण्याची संधी चालून आलीय.
यंदाच्या पर्वात सायली कांबळे हे नाव चांगलच चर्चेत आलं होतं. तिच्या गायनकौशल्यासोबतच तिचे आई-वडीलही या कार्यक्रमातून चर्चेत आले. या कार्यक्रमातून सायलीला चांगली लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिच्या एकापेक्षा एक परफॉर्मन्सने परिक्षकांची मनं जिंकली आहेत.
सायली इतकी लोकप्रिय झाली की आता तिच्याकडे मोठी संधी चालून आलीय. सायलीला चक्क सिनेमासाठी गाणं रकॉर्ड करण्याची संधी मिळालीय. 'कोल्हापुर डायरीज' या मराठी सिनेमासाठी सायलीने गाणं रेकॉर्ड केलय. प्रसिद्ध संगीतकार, गायक अवधुत गुप्तेने या सिनेमाची गाणी कम्पोझ केलीय. जोई राजन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलय. कोल्हापुर डायरीज हा मल्याळम ब्लॉकबस्टर सिनेमा अन्गामाली डायरीजचा रिमेक आहे. या सिनेमात अभिनेता भूषण पाटील आणि अभिनेत्री गायत्री दातार झळकणार आहे. सायलीने नुकतच या सिनेमासाठी गाणं रेकॉर्ड केलय.
जो राजन दिग्दर्शित कोल्हापूर डायरीजच्या ह्या गाण्याला अवधूत गुप्तेनी संगीत दिलंय. स्वप्नील बांदोडकर आणि सायली कांबळे ह्यांनी हे रामँटिक गाणं गायलंय. जे लवकरच गायत्री दातार आणि भुषण पाटील ह्यांच्यावर चित्रीत होणार आहे.
फिल्ममेकर जो राजन म्हणाले, “सायलीच्या गळ्यात जादु आहे. तिचा इंडियन आयडलचा संगीत प्रवास मी गेले कित्येक महिने पाहिलाय. त्यामुळेच मला तिचा अभिमान आहे. ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुलीला मराठी फिल्मसाठी ब्रेक देताना मला खूप आनंद होतोय.”
संगीतकार, गायक, फिल्ममेकर अवधूत गुप्ते म्हणतात, “आमचे दिग्दर्शक जो राजन ह्यांना सायलीचा आवाज खूप आवडला होता. त्यामुळे त्यांनीच मला सायलीचे नाव ह्या गाण्यासाठी सुचवले. ती किती उत्तम गायिका आहे, ते ती दरवेळी सिध्द करते. सायलीच्या रूपाने एक टॅलेंटेड गायिका महाराष्ट्रालाच नाही तर अख्या जगाला मिळालीय, असं मला वाटतं.