सोनीलिव्हने मराठी रॅप प्रतिभांना आणले प्रकाशझोतात; पुण्यातील उदयोन्मुख रॅपर गणेशला मंच देण्यासोबत दिली दोन रॅप कंपोझिशन्स मराठी ओरिजिनल 'शांतीत क्रांती'मध्ये झळकण्याची संधी
रॅप इंडस्ट्रीच्या सर्वसमावेशक गतीशीलतेने जीवनाला कलाटणी देणा-या अमूल्य संधीचा शोध घेत असलेल्या अनेक कलाकारांसाठी यशस्वीरित्या दरवाजे खुले केले आहेत. सोनीलिव्हची मराठी ओरिजिनल 'शांतीत क्रांती'ला लक्षवेधक पटकथा, सर्वोत्तम अभिनय आणि मनाला आकर्षून घेणा-या संगीतासाठी प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यासारख्या शैलीसाठी रॅप-संगीताचा शोध घेत सोनीलिव्हसोबत या सिरीजच्या निर्मात्यांनी पुण्यातील तरूण रॅपर गणेशला प्रकाशझोतात आणले आणि सिरीजच्या माध्यमातून त्याची प्रतिभा दाखवण्याची संधी दिली.
भाजीपाला विक्रेता ते महत्त्वाकांक्षी, उदयोन्मुख रॅपर बनण्यापर्यंत या प्रतिभेला अखेर 'शांतीत क्रांती'सह त्याच्या करिअरमधील पहिला ब्रेक मिळाला आहे. सिरीजच्या थीमला कायम राखत २४ वर्षीय गणेशने सिरीजसाठी दोन गाणी संगीतबद्ध करण्यासोबत त्यांना रॅपचे रूप दिले आहे. सोनीलिव्हने नुकतेच त्याने गायलेल्या गाण्यांपैकी एक - 'दोस्तीत कुस्ती'चा म्युझिक व्हिडिओ सादर केला. सोनीलिव्हवर स्ट्रिमिंग होत असलेली सिरीज 'शांतीत क्रांती' ३ जिवलग मित्रांच्या साहसी मोहिमेला सर्वात अर्थपूर्ण, पण विलक्षण पद्धतीने दाखवते, ज्यामुळे ही सिरीज प्रेक्षकांचे त्वरित लक्ष वेधून घेते.
सर्वोत्तम गीतरचनेसह काही रोचक ताल व भावनांचा समावेश असलेले गणेशचे रॅप संगीत निश्चितच तुमचे लक्ष वेधून घेते. याव्यतिरिक्त सिरीजच्या शीर्षक गाण्यामध्ये आधुनिक संगीताचे विलक्षण संयोजन आहे आणि या गाण्याचे दिग्दर्शन सौरभ भालेराव यांनी केले असून सुनिल सुकटणकर यांनी लेखन केले आहे.
सारंग साठये म्हणाले, ''सिरीज 'शांतीत क्रांती' ही गोंधळामध्ये शांतता शोधण्याबाबत असली तरी या ३ जिवलग मित्रांना राग येतो, तेव्हा त्यांच्यामध्ये मोठे भांडण होते. आणि संगीत देखील या सीनच्या वातावरणाशी जुळणारे आवश्यक होते आणि येथेच रॅप संगीताचा वापर करण्याचा विचार मनात आला. 'शांतीत क्रांती' ही भावनांनी भरलेल्या तरूणांच्या जीवनातील विलक्षण साहसाबाबतची सिरीज आहे. गणेशचे रॅप कंपोझिशन्स सिरीजच्या उत्साहामध्ये उत्तमपणे जुळले. अशा प्रतिभेला त्याच्या अद्वितीय रॅपिंग कौशल्यांसाठी प्रकाशझोतात आणणे, सन्मानित व प्रशंसित करणे गरजेचे आहे.''