By  
on  

आई-मुलीचं भावनिक नातं उलगडणार नवं गाणं ‘सुख दुःख सारी’

‘सुख दुःख सारी’ हे गाणं गणपती, गणेशोत्सव आणि त्या दरम्यानच्या काळात उलगडत जाणाऱ्या नात्यांच्या पैलूंवर प्रकाश टाकणारं आहे. या गाण्यातून सुप्रसिद्ध निर्माती पूनम शेंडे आणि बालकलाकार सारा पालेकर पदार्पण करत आहेत. आई आणि मुलीची ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. पूनम शेंडे यांनी यापूर्वी बस स्टॉप, जाउंद्याना बाळासाहेब, स्वामी पब्लिक लिमिटेड, मॅटर या सारख्या अनेक प्रख्यात मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून त्या या गाण्यात प्रथमच पदार्पण करत आहेत. सारा पालेकर ही बालकलाकार असून ती सोशल मिडिया इन्फ्लूएंसर आहे. इंस्टाग्रामवर तिचे प्रचंड फॉलोअर्स असून तिच्या रील्सला लाखोंमध्ये व्ह्यूज येतात, अनेकोत्तम कमेंट्स, लाईक्स येत असतात. बालकलाकार म्हणून हे तिचे पहिलेच गाणे आहे.

हे गाणं सुप्रसिद्ध गायिका आनंदी जोशीच्या आवाजात स्वरबद्ध झाले असून ते अक्षय संत यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याला स्वप्निल सावंत आणि जीवन मराठे यांनी संगीतबद्ध केलेले असून याची अरेंजमेंट सत्यजित केळकर यांनी केली आहे. पूनम शेंडे या गाण्याचा अनुभव शेअर करताना म्हणाल्या- "कासट वाड्यासारख्या सुंदर सुखद ठिकाणी हे गाणे चित्रित करण्यात आले याचा मला खूप आनंद झाला आहे. सारा जरी बालकलाकार असली, आणि हा तिचा पहिला प्रकल्प आहे तरी तिच्यात एक कमालीची जिद्द आणि उर्जा आहे. एक दृश्य होते जिथे तिला साडी नेसून नथ घालायची होती. तिची नथ शूट करताना पडली पण विचलित न होता साराने शॉट पूर्ण केला आणि दृश्य संपल्यानंतरच तिने नथ उचलली. बऱ्याच अनुभवी अभिनेत्रींना देखील जे जमत नाही ते कसब साराच्या अंगी जाणवते. साराने तिच्या दृश्यावर खूप लक्ष केंद्रित केले होते. तिने सर्व दृश्ये अतिशय सुंदरपणे आणि दिग्दर्शनाप्रमाणे केली. तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्यात मला आनंद होत आहे आणि आमच्या टीमबरोबर काम करताना मला खूप आनंद झाला आहे कारण हा एक अद्भुत अनुभव आहे आणि मी गाण्याबद्दल खूप उत्सुक आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांना ते नक्की आवडेल."

साराच्या आईने या गाण्याचा अनुभव शेअर केला - "हे साराचं पहिलं गाणं आहे. यापूर्वी तिने कधीही खऱ्या कॅमेऱ्याचा सामना केला नाही. तिचे इन्स्टाग्राम रील खूप लोकप्रिय आहेत परंतु आम्ही नेहमीच मोबाइल कॅमेऱ्यावर शूट करतो. तिला नुकताच इन्फ्लूएंसर म्हणून एक पुरस्कार मिळाला. तिला या गाण्याचे चित्रीकरण करताना खूप मज्जा आली आणि तिने कॅमेऱ्याचा खरोखर चांगला सामना केला. ती खूप आनंदी आहे आणि गाण्या बद्दल उत्सुक आहे."

निर्माते मधुसूदन कुलकर्णी म्हणाले- "गणेश उत्सव हा भारतातील सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि या उत्सवात आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर गाणे आणत आहोत ज्यात आई आणि मुलीचे सौम्य परंतु मजबूत नाते दर्शविले आहे. गजानना नावाच्या नाटकातील हे गाणं आहे, नाटकातल गाणं असल्यामुळे या गाण्याची लांबी खूप कमी आहे. एक ते सव्वा मिनिट लांबीच्या गाण्यात संपूर्ण कथा दाखवणं हे एक कौशल्य होतं पण आमचे दिग्दर्शक योगेश तवार, कॅमेरामॅन राहुल झेंडे आणि टीमने ते अतिशय सुरेख पद्धतीने करण्यात यश मिळवलं आणि एक सुंदर पटकथा चित्रित केली. आम्ही हे गाणे बनवण्याचा आनंद घेतला आहे, ‘सुख दुःख सारी’ या गाण्याचा प्रवास खूप मजेदार होता आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही हे गाणं आवडेल. हा गणेश उत्सव नक्कीच खास असणार आहे."
या गाण्यासाठी क्रिएटीव्ह हेड म्हणून अमोल घोडके व प्रॉडक्शन हेड म्हणून वैभव लामतुरेंनी धुरा सांभाळली आहे. या गाण्याचं दिग्दर्शन योगेश तवार यांनी केलं आहे, छायांकन राहुल झेंडे यांनी केले असून छायाचित्रण प्रणव सिंग यांनी केले आहे. वेषभूषेची जवाबदारी नक्षत्रा विनीत तर रंगभूषेची धुरा त्रिवेणी पेटकर यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन गणेश पांचाळ यांनी केले आहे. या गाण्याचं चित्रीकरण कासट वाडा येथे झालेलं असून सुमित जिंदाल यांनी प्रसिद्धी व विपणन सल्लागाराची भूमिका बजावली आहे. हे गाणं ५ सप्टेंबर २०२१ रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive