अभिनेत्री अक्षया नाईकने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून मराठी अभिनयविश्वात पदार्पण केलं. दिलदार प्रेमाची ही वजनदार गोष्ट बघता बघता अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. अभिचं मन सुंदराने म्हणजेच आपल्या लाडक्या लतिकाने जिंकल आहे ते तिच्या समजूतदारपणामुळे आणि स्वभावामुळे. पण, लतिका अभिचं प्रेम स्वीकारेल? हे जाणून घेण्यासाठी अवघा महाराष्ट्र आतुर आहे.
या दरम्यान अभिनेत्री अक्षया नाईकने खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते, ‘हसत, खेळत, मारामारी करत, एकमेकांची टिंगल करत, थोडं रडून, तर जरा सांभाळून, एकमेकांना बरोबर घेत आम्ही सगळेच रोज थोडसं एकमेकांकडून शिकून पुढे सरलो. WRITERS, DIRECTORS, TECHNICIANS and ofcourse PRODUCERS आणि @colorsmarathiofficial Creative Team चं हे जितकं श्रेय आहे, तितकच तुम्हा प्रेक्षकांचं पण आहे.’