‘आशा एक उत्तम गायिका आहे’ म्हणत लतादीदींनी दिल्या आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

सदाबहार आवाजाची स्वामिनी असलेल्या आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे. जगभरातून आशाताईंचे फॅन्स त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यावेळी आशाताईंना खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. लतादीदींनी आपल्या खास अंदाजात आशाताईंना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

लतादीदी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘आज माझी लहान बहीण आशा भोसलेचा वाढदिवस आहे. मी तिला आशिर्वाद  शुभेच्छा देईन. आशा कमाल आणि चतुरस्त्र गायिका आहे. ईश्वर तिला दीर्घायु मिळो. आणि तिच्या कुटुंबावर सौख्याची बरसात होवो हीच प्रार्थना.

Recommended

Loading...
Share