Video : शंकर महादेवन यांच्या “देवा ओ देवा” या गाण्याने केला मोठा रेकॉर्ड

By  
on  

सनशाईन म्युझिकने देवा ओ देवा या भक्तीसंगीताची निर्मीती केली आहे. हे गाणे गायक शंकर महादेवन यांनी उत्कृष्टरीत्या गायले आहे. तर भगवान श्री कृष्णाची भूमिका साकारून घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेता सौरभ राज जैन या गाण्यात गणपती बाप्पाच्या भक्ताची भूमिका निभावली आहे. तर सौरभ सोबत चाइल्ड आर्टिस्ट शिवांजलि पोरजे  मुख्य भूमिकेत आहेत. कार्तिक व्यास लिखित हे गाण असून राजीव रूहिया यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे तर राजू सरदार यांनी संगीतबद्ध केले आहे.

”देवा ओ देवा” हा म्युझिक व्हीडिओने युट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. देवा ओ देवा भक्तीसंगीताला रीलीजच्या 7 दिवसांत 9 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे या संगीताने नवीन विक्रम केला आहे.

Recommended

Loading...
Share