By  
on  

अभिनेत्री सायली चौधरीने धरला 'मुंबई इंडियन्स थीम'मध्ये ठेका

दुनिया हिला देंगे हम' या ब्रीदवाक्यावर मुंबई इंडियन्सचे थीम सॉंग मुंबईकरांना ठेका धरायला लावत आहे. 'मुंबईच्या प्रत्येक कुटुंबाचा अभिमान आहे मुंबई इंडियन्स' असा संदेश देणारा हा थीम सॉंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वच खेळाडू या व्हिडीओमध्ये नाचताना दिसत असून मराठी अभिनय क्षेत्रातील मेहनती अभिनेत्री सायली चौधरी हिने देखील या व्हिडीओमध्ये ठेका धरला आहे. 

स्वतःच्या अंगी असलेल्या कलागुणांना जोपासत सायलीने पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या थीमकरिता नृत्यांगना म्हणून काम केले. अभिनयासह लहानपणापासून असलेली नृत्याची आवड जोपासत तिने प्रेक्षकांची मने मात्र सांभाळली.  सायली चौधरी अभिनय क्षेत्रात चांगलीच रमताना दिसत आहे.   अभिनयाच्या जोरावर तिने तिचा चाहतावर्ग देखील जमा करायला सुरुवात केली आहे. 

नाटक आणि मालिका विश्वात कार्यरत असलेली सायली कायमच अभिनयाला प्रथम प्राधान्य देत आली. 'रुंजी', 'देवयानी', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'लक्ष्य', 'छत्रीवाली', 'अस्मिता', 'तू अशी जवळी रहा', 'कारभारी लयभारी', 'सारे तुझ्याच साठी' यासारख्या बऱ्याच मालिकांमधून सायलीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. 'झिम पोरी झिम', 'गलतीसे मिस्टेक' या नाटकांतूनही सायलीने उत्तम कामगिरी करत अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटविला. बऱ्याच जाहिरातींमधूनही सायलीचा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला. एक उत्कृष्ट अभिनेत्री असलेली सायली एक उत्तम नृत्यांगना देखील आहे हे या व्हिडीओ मधून प्रेक्षकांना पाहणे रंजक ठरले. अभिनयाप्रमाणे तिच्या नृत्यालाही प्रेक्षक भरभरून दाद देतील यांत शंकाच नाही.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive