मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यासोबत अनेक जाहिरातीतही ते झळकले होते. आबा म्हणून त्यांना संपूर्ण सिनेसृष्टीत ओळखले जायचे. ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’या दिवाळी स्पेशल साबणाच्या जाहिरातीतील ‘अलार्म काका’ म्हणून ते फार प्रसिद्ध होते. जाहिरातींमधला ते एक प्रसिध्द चेहरा होते.
मराठीसोबतच त्यांनी हिंदीतही काम केले होते. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या सिनेमात ते झळकले होते.
विद्याधर करमरकर यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ते मुंबईतील विलेपार्ले येथे वास्तव्यास होते.