मराठी अभिनेता आदिश वैद्यला पर्यटन करायला खूप आवडते. संपुर्ण जग फिरायची त्याची इच्छा असून, जेव्हा वेळ मिळेल तसा बॅग पॅक करून भटकंती करायला जाण्यास तो एका पायावर तयार असतो. माणसाने नेहमी प्रवास करत रहायला हवं, असे तो मानतो. म्हणूनच की काय, आदिशने आपल्या मनगटावर फ्रीडम टू ट्रॅव्हल चा संदेश देणारा टॅटू कोरला आहे.
याबद्दल बोलताना आदिश सांगतो, "जेव्हा टॅटू करायचा विचार केला, तेव्हा माझ्या स्वभावाला साजेसं आणि माझ्या खूप जवळचं असं काय आहे याचा मी विचार केला, मला भटकंती करायला आवडते, त्यामुळे प्रवास याच विषयावर टॅटू करायचं ठरवलं".
आज वर्ल्ड टुरिझम डे च्या निमित्ताने आदिश वैद्यची ही टॅटू स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल.