By  
on  

'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांचे काय केलं.. अभिजीत सावंत म्हणतो,

छोट्या पडद्यावरचा सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो इंडीयन आयडलने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या शोचा पहिला सीझन तुफान गाजला. रिएलिटी शो ही संकल्पना त्या काळी नवीन असल्याने भारतात या शोला प्रेक्षकांची खुप पसंती मिळाली. या गाण्याच्या रिएलिटी शोमध्ये आपल्या मुंबईच्या मराठमोळ्या अभिजीत सावंत या तरुणाने विजेतेपदावर नाव कोरत हा सीझन जिंकला. त्यामुळे  अभिजीत सावंत हा मराठमोळा तरुण रातोरात स्टार बनला. त्याचे अनेक म्युझिक व्हिडीओज् आले. अनेक हिंदी-मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायनासाठी त्याला पाचारण करण्यात आले. त्याचं अवघं आयुष्यचं यामुळे बदलून गेलं. 

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तो त्याच्या जिंकलेल्या रकमेबद्दल बोलताना दिसला होता, “त्याने ती रक्कम कुठे वापरली आणि त्याचे समाधान का झाले नाही” याबाबतची माहिती दिली होती.

इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकल्यानंतर तुला काही ठराविक रक्कम मिळाली होती, त्याचे तू काय केलंस? असा प्रश्न त्याला एका मुलाखतीदरम्यान विचारला होता. त्यावेळी अभिजीत म्हणाला, “मी त्या रक्कमेची उत्तम गुंतवणूक केली होती. २००८ ला आर्थिक मंदीदरम्यान आम्ही पैशांची बचत केली होती. त्यातून आम्ही काही ठिकाणी गुंतवणूक केली होती. काही वर्षांपूर्वी मी एक घर खरेदी केले. पण आता मात्र मला याचा पश्चाताप होतं आहे,” असे त्याने सांगितले.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive