लोकप्रिय अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर महिनाभरापुर्वी आई झाली. ती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आई झाल्याची गोड बातमीही तिने चाहत्यांशी शेअर केली होती. आता तिने पहिल्यांदाच बाळासोबतचा क्युट फोटो शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये उर्मिलाने ‘विषय गोल आहे’ हे कॅप्शन देत बाळाचा गोड फोटो शेअर केला आहे.
प्रेग्नंसीमध्येही उर्मिलाने चाहत्याशी अनेक फोटो शेअर केले. बेबी बम्पचे फोटो पोस्ट करण्यावरुन तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं होतं. पण तिने या सगळ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं.