देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव ९दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मांगल्य आणि चैतन्य घेऊन नवरात्रोत्सवाचं सर्वत्र उ्साही वातावरण पाहायला मिळतंय. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्रींमध्ये नवरात्रौत्सवानिमित्ताने विविध फोटोशूट्स करण्याचा मोठा ट्रेंड रुजू होतोय.
अशीच एक सुंदर कल्पना घेऊन देवी रुपातलं एक छानसं फोटोशूट प्रेक्षकांच्या हद्यात स्थान मिळवणा-या शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरने केलं आहे.
आज नवरात्रीच्या दुस-या दिवशी अपूर्वा मुंबादेवीच्या रुपात पाहायला मिळतेय.
.मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता. मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे.
मुंबादेवी या देवीच्या नावावरुन शहराला मुंबई हे नाव पडले.मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी (कोळी बांधव) केली.
मुंबादेवी, सर्व संकटात मुंबईचे रक्षण करते अशी भावना आहे.
अपूर्वाच्या या अनोख्या संकल्पनेचं सर्वत्र कौतुक करत आहेत.