By  
on  

‘दादा एक गुड न्युज आहे’ च्या टीमचं यासाठी होत आहे कौतुक

गेले दीड वर्षं बंद असलेलं थिएटरचं दार आता कुठं उघडलं आहे.  हळूहळू प्रेक्षकांची पावलं नाट्यगृहांकडे वळत आहेत. काही दिवसांपुर्वीच या नाटकाचा लॉकडाऊननंतरचा पहिला प्रयोग पार पडला. बहीण-भावाच्या नात्यातील बंध अत्यंत अलवारपणे मांडणा-या या नाटकाला  प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. पण आणखी एका कारणासाठी या नाटकाचं कौतुक होत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12)

 

गेल्या २५ वर्षांपासून दीनानाथ नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवर क्लार्क म्हणून कार्यरत असलेल्या विलास पावसकर करोनामुळे निधन झालं. घरातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याने या कुटुंबावर आभाळच कोसळलं.  हे समजल्यावर सोनल प्रोडक्शन्सननं लॉकडाउननंतरच्या या पहिल्या प्रयोगाच्या नफ्याची रक्कम पावसकर कुटुंबाकडे नाट्यगृहातच सुपूर्द केली. यावेळी, विलास पावसकरांची पत्नी आणि दोन मुलं उपस्थित होते. प्रेक्षकांनीही सोनल प्रॉडक्शनच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive