By  
on  

'बालदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थीदशेत दाखल.........' म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केली खास पोस्ट

माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो असं कुणीतरी म्हटलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण नवीन काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. अभिनेत्री प्राजक्ता माळी नेमका हाच मंत्र जपताना दिसते आहे.  प्राजक्ताने नुकतीच कथ्थक शिकत असल्याचं चाहत्यांशी शेअर केलं आहे.

 

 

‘कथक नृत्य शिकण्यास प्रारंभ #finally बालदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थीदशेत दाखल माझी मैत्रिण, उत्कृष्ट नृत्यांगना आणि गुरू शर्वरी जेमेनीस @sharvarijamenis हिच्याकडून आजपासून नृत्याचे धडे घ्यायला सुरूवात केली.
योगायोगाने आज शर्वरी ताईच्या गुरू, “डॅा. रोहिणीताई भाटे” ह्यांचा ९७ वा जन्मदिवस ;
आणि आज @artofliving foundation ला जन्म घेऊन ४० वर्ष पुर्ण झाली. पुन्हा एकदा नर्तिका दशेत प्रवेश. विशेष म्हणजे प्राजक्ताने यापुर्वी भरतनाट्यममध्ये विशारद केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive