कलर्स मराठी वरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘घाडगे अॅण्ड सून’. या मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेतील अक्षय-अमृता ची केमिस्ट्री लोकांना आवडलीच याशिवाय समंजस, विचारी माई रसिकांच्या मनात घर करून गेल्या.
कियारा आणि वसुधा यांनी खलनायिका उत्तम साकारली. या मालिकेने 500 हून एपिसोड्स पुर्ण केले आहेत. या मालिकेचा आता गुजराती रिमेक बनणार असल्याचं समोर येत आहे. ‘मोटी मा नी नानी वहू’ असं या मालिकेचं नाव आहे. एका सोशल मिडिया पोर्टलने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या मालिकेच्या रिमेकमध्ये रोहिणी हट्टंगडीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे.