By  
on  

बिग बॉस मराठी 3 : घरातून गायत्री दातारची एक्झिट

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाली नव्या सदस्यांची एंट्री. घराचे रूपांतर लिलिपुट नगरात झाले आणि हे नवे सदस्य बनले हुकूमशहा. हा संपूर्ण आठवडा या हुकुमशहांनी चांगलच गाजवला मग तो एलिमनेशन टास्क असो, साप्ताहिक कार्य असो वा कॅप्टन्सी टास्क. मीनलला मिळाला बिग बॉस मराठीच्या घराचे शेवटचे कॅप्टनपद. तर नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील नॉमिनेट झाले. यामध्ये काल मीरा जगन्नाथ सेफ असल्याचे महेश मांजरेकरांनी घोषित केले.

उत्कर्ष स्नेहामध्ये झाली शाब्दिक चकमक तर बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे विशालला सांगण्यात आली आता यामुळे इतक्या दिवसांची मैत्री पणाला तर लागणार नाही ना ? उत्कर्ष आणि जयने यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण करत लावणी सादर केली. इतक्या दिवसांच्या प्रवासानंतर कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये आल्या ज्यामध्ये गायत्री दातारला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.


 
आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उरले आहेत टॉप ७ सदस्य. बघूया हा आठवडा कसा जाणार ? काय काय धम्माल टास्क बिग बॉस सदस्यांना देणार. जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन ३ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.    

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive