By  
on  

कुशल बद्रिके सोबतचा फोटो शेयर करत अभिनेत्री मोनालिसा बागल म्हणते..

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर बरीच मंडळी भेटली, ज्यांच्यासोबत केवळ सहकलाकाराचं नातं नव्हतं तर त्याहून जास्त आपुलकीचं नातं बनलं होतं. कुशल बद्रिके, भाऊ कदम, स्नेहल, रोहित, योगेश शिरसाट, निलेश सर, श्रेया बुगडे यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. खरं तर समोरच्या व्यक्तीला हसवणे हा टास्क असतो पण ही सर्व कलाकार मंडळी अभिनय आणि लिखाणातून किती सहजपणे आपल्या सर्वांना हसवतात... मनापासून दाद द्यावीशी वाटते त्यांच्या मेहनतीला आणि डेडिकेशनला!

नुकतंच, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांचा #पांडू सिनेमा पाहिला. अफलातून सिनेमा आणि दोघांचं पण काम त्याहून जबरदस्त. #CHYD मध्ये एकत्र काम केल्यामुळे दोघांचंही अभिनय कौशल्य जवळून पाहिलंय, त्यामुळे सतत एक इन्स्पिरेशन मिळत राहिलंय. त्यात, कुशल सरांची मी फॅन आहेच. माणुसकीच्या नात्याने ते व्यक्ती म्हणून कमाल आहेत. त्यांची कामं, त्यांची कामातली एनर्जी  हे माझ्या सारख्या प्रत्येक कलाकारासाठी इन्स्पिरेशन आहे... कुशल सर आणि भाऊ कदम दोघंही कायम त्यांच्या कामातून प्रेक्षकांना, आम्हां सर्वांना मनोरंजनाची मेजवानी देत असतात... 'पांडू' च्या यशासाठी त्यांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन आणि माझ्या पाठीशी कायम उभं राहण्यासाठी, मला सपोर्ट करण्यासाठी कुशल सर तुम्हाला खूप खूप थँक्यू! 

'चला हवा येऊ द्या' च्या निमित्ताने मी आयुष्यात खूप चांगली माणसं कमवली, हे आनंदाने सांगावंसं वाटतंय!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive