By  
on  

'राजा रानीची गं जोडी' मालिकेतील हा अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत

'राजा रानीची गं जोडी' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेने अल्पावधितच रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ऑनस्क्रीनप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला रसिकांना आवडतं. या मालिकेत रणजित  ढोले-पाटीलच्या मोठ्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश कोरडे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. 

अभिनेता शैलेश कोरेडे याना आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहचवली. यासोबतच लग्ननातल्या अविस्मरणीय क्षणांचे काही फोटोसुध्दा शेयर केले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

शैलेशने अभिनेत्री श्रृती कुलकर्णीसोबत विवाह केला आहे. स्पेशल पोलिस फोर्स या मालिकेत व समुद्र या नाटकांत तिने भूमिका केल्या आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive