By  
on  

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन

मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ आणि प्रसिध्द अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन झालं आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या. वृध्दापकाळामुळे माहिम येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.  ‘लाखाची गोष्ट’ हा त्यांचा गाजलेला सिनेमा. या सिनेमामुळे मराठी चित्रपटसृष्टीला रेखा यांच्या रूपाने घरंदाज, प्रेमळ, शालीन आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व लाभलेली एक उत्तम अभिनेत्री मिळाली. ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’ (यात त्यांची दुहेरी भूमिका होती), ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ तर अगदी अलीकडचा ‘अगंबाई अरेच्चा’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट.

प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली मालिका. मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका गाजली. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ तर प्रेक्षकांच्या आजही लक्षात आगे. ही प्रेमळ आजी घराघरांत पोहचली. त्यांची आजी ही व्यक्तिरेखा पुढे अनेक मानवंत जाहिरातींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

 

रेखा यांना संजीवनी आणि माधवी या दोन मुली आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive