By  
on  

‘टारझन’फेम अभिनेते हेमंत बिरजे यांच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल

अभिनेते हेमंत बिरजे यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात हेमंत बिरजे आणि त्यांची पत्नी दोघंही जखमी झाले आहेत. सोबतच त्यांच्या मुलीलासुध्दा अपघाताचा फटका बसला आहे. परंतु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांना जास्त दुखापत झाली नसून त्यांच्यावर पवना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

कारने दुभाजकाला दिलेल्या धडकेनंतर हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.तळेगाव टोलनाक्याजवळ काल रात्री हा अपघात घडल्याची माहिती आहे. 

१९८५ मध्ये आलेल्या ‘टार्जन’ चित्रपटामुळे हेमंत बिरजे प्रसिद्धीस आले होते. या सिनेमात किमी काटकरसोबत दिलेल्या बोल्ड सीनमुळे ते चांगलेच चर्चेत होते. परंतु त्यांची ही प्रसिध्दी व यश जास्त टिकलं नाही. या सिनेमानंतर ते बॉलिवूडपासून दूर गेले. नंतर फ्लॉप चित्रपटांमुळे त्यांना काम मिळणं बंद होत गेलं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive