By  
on  

पुण्यातील चार वर्षाचा स्वर्णव चव्हाण सापडल्यानंतर हा मराठी अभिनेता म्हणतो...

पुण्यातील बालेवाडीच्या उच्चभ्रू वस्तीतून अपहरण झालेला चार वर्षांचा मुलगा स्वर्णल चव्हाण उर्फ डुग्गू हा अखेर बुधवारी दुपारी सापडला. पुण्यातील आयुक्तांनीसुध्दा तो सापडल्याची अधिकृत माहिती दिली आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं. गेले आठवडाभर सोशल मिडीयावरही फक्त त्याच्या अपहरणाची बातमी व्हायरल होत होती. त्याचे वडील सतीश चव्हाणसुध्दा सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरुन मुलाच्या सुटेकेसाठी भावनिक साद देत होते. पण अखेर पुणे पोलिसांना यश आलं. 

स्वर्णव चव्हाण सापडल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेता प्रासद खांडेकर यानेही एक पोस्ट केली आहे. प्रसादने पोस्ट शेअर करत पुणे पोलिसांचे आभार मानले आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रसादने स्वर्णवचा त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “डॉ. सतीश चव्हाण यांचा मुलगा स्वर्णव (डुग्गु) पूनावळे येथे सुखरूप सापडला. अपहरण झालेला स्वर्णव आज आपल्या आईवडिलांसोबत आहे. पुणे पोलिसांचे मनापासून आभार, अभिनंदन आणि त्रिवार वंदन”, असे कॅप्शन प्रसादने दिले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive