भारताची गानकोकिळा लता मंगेशकर या गेल्या 14 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहे. करोनाची लागण झालेल्या लता दीदींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. डॉक्टरांची सर्वोत्तम टीम लता दीदींची काळजी घेत आहेत. लता दीदी यांनी यंदा सप्टेंबरमध्ये 92 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी जगभर चाहते प्रार्थना करतायत.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची एक अपडेट नुकतीच समोर आली आहे. त्यांच्या वयोमानानुसार त्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत नसल्याने अद्याप सुधारणा झालेली नसली तरी प्रकृती स्थिर आहे. वयोमानामुळे त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी वेळ लागेल, कृपया अफवा वा चुकीच्या बातम्या पसरवू नका. असे मंगेशकर कुटुंबियांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवास अय्यर यांनी सांगितलं आहे.
लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी लता दीदी लवकरच घरी परताव्यात यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचं आवाहन केल्याचंही अय्यर यांनी सांगितलं आहे.