By  
on  

संगीत रंगभूमीच्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज पहाटे निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या अभिनयाने व गायनाने किर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवला होता. २०१८ साली पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive