Photos : रोहित आणि जुईलीची हळद रंगली, या कलाकारांनी केला कल्ला

By  
on  

प्रसिध्द पार्श्वगायक गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा येत्या २३ जानेवारी रोजी  लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र त्याआधी लग्नाआधीच्या विविध विधी सध्या सुरु आहेत. यातच नुकताच दोघांचा साखरपुडा पार पडलाय. नुकतेच रोहित आणि जुईलीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले होते, त्यानंतर आता त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. 

रोहित -जुईलीच्या हळदीला शुभ्र पांढ-या रंगाचा ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. सर्व नातेवाईक व मित्रमंडळींनी नवरा-नवरीप्रमाणेच व्हाईट पोशाख केला आहे. 

अभिनेता सिध्दार्थ चांदेकर व त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर या दोघांनीसुध्दा रोहिलीच्या हळदीत धम्माल कल्ला केला. याचाच व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. 

सोशल मिडीयावर रोहित आणि जुईलीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. याशिवाय #Rohilee हे हॅशटॅगदेखील चर्चेत आलय.

 

Recommended

Loading...
Share