बिग बॉस मराठी 3 च्या घराबाहेर पडल्यानंतर जय आणि मीराचा तो फोटो होतोय व्हायरल

By  
on  

करोना लॉकडाऊनमुळे दोन वर्षांच्या गॅपनंतर आलेला  बिग बॉस मराठीचा यंदाचा 3 रा सीझन प्रचंड गाजला. विविध कारणांसाठी हा शो चर्चेत होता. नेहमीच घरातील सेलिहब्रिटी सदस्यांची मैत्री ही प्रेक्षकांसाठी मुख्य आकर्षण ठरते. शो संपल्यावर घराबाहेरसुध्दा हे स्पर्धक एकत्र दिसले तर त्यांच्या मैत्रीची वाहवा होते. बिग बॉसच्या घरातील अशीच एक मैत्री म्हणजे जय व स्नेहा. या सीझनमध्ये त्यांच्या मैत्रीबद्दल खुप बोललं गेलं व पाहायलासुध्दा मिळालं. पण नुकतंच जयला स्नेहाचा विसर पडल्याचं चित्र असून तो मीरासोबत स्पॉट झाला आहे. 

सध्या सोशल मिडीयावर बिग बॉस मराठीतील सहस्पर्धक व मैत्रीण मीरा जग्गनाथसोबत जयचा फोटो ्व्हायरल होतोय. दोघंही मस्त समुद्रकिनारी फिरताना पाहायला मिळतायत. हातात हात गुंफून दोघं मस्त निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेतायत. हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, चर्चेला उधाण आलंय. 

पण इतंक लिंक-अप करण्याची काही गरज नाही. जय-मीराची जोडी एका आगामी म्युझिक अल्बमसाठी एकत्र आली आहे. दिसते चिकनी या अल्बममध्ये दोघं फिचर करतायत. त्याच्या शूटमधला हा फोटो आहे. या मम्युझिक अल्बमचा फोटो मीराने इन्स्टाग्रामवर शेयर करुन चाहत्यांची उत्सुकता वाडवलीय. 

Recommended

Loading...
Share