By  
on  

प्रत्येकाला प्रेमात पाडणारा 'वन फोर थ्री' चित्रपट ४ मार्चला होणार सिनेमागृहात दाखल

शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित आणि  विरकुमार शहा निर्मित 'वन फोर थ्री' हा खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक मायबाप ही आमच काळीज आहे! होय! आणि या काळजाच्या काळजीपोटीच सध्याचा कोविड संसर्ग आणि निर्बंधांमुळे आपल्या सर्वांच्या काळजाजवळची मराठी प्रेमकथा ११  फेब्रुवारी ऐवजी पुढे नेत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट असून बॉलिवूडने देखील या चित्रपटाची दखल घेतली होती, इतकेच नव्हे तर करेन तर मामाचीच, हे आपलं काळीज हाय या टॅगलाईनसुद्धा प्रेक्षकांकडून सतत ऐकायला मिळत होत्या मात्र हा चित्रपट ११ फेब्रुवारी ऐवजी ४मार्चला प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.  

चित्रपटाची नवी तारीख जाहीर करत चित्रपटाचे दिग्दर्शक याबाबत असे म्हणतात की, 'जगभरात कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनची भीती यामुळे नववर्षात पुन्हा एकदा संकट येऊन उभे राहिले आहे. वन फोर थ्री चित्रपट हा प्रेमाचे फंडे देणारा असल्याने हा चित्रपट प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत प्रदर्शित करण्याचे आयोजले होते मात्र कोरोना आणि ओमिक्रॉनच्या नव्या संकटामुळे ११ फेब्रुवारी ऐवजी हा चित्रपट ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अचानक उद्धवलेल्या या संकटामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यास काही  दिवस वाट पाहावी लागणार आहे'. 

या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार असे पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार हे या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. चित्रपट प्रदर्शनात वितरकाचीही मुख्य भूमिका असते, या चित्रपटात अनिल थडाणी यांनी वितरकाची भूमिका अगदी योग्यरित्या निभावली आहे.

"हे आपलं काळीज हाय" या 'वन फोर थ्री' चित्रपटाच्या टॅगलाईनने आधीच धुमाकूळ घातला असताना हा चित्रपट काय नवे घेऊन येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना चित्रपट प्रदर्शन लांबणीवर गेल्याने प्रेक्षकांमध्ये थोडीशी नाराजी दिसून येत आहे. मात्र जास्त विलंब न करता हा चित्रपट प्रेमाचे विविध रंग घेऊन ४ मार्चला मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज आहे. या चित्रपटात प्रेमाचे वेगळेपण नेमके काय आहे हे अनुभवता येणार असून याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive