By  
on  

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन

ज्य़ेष्ठ साहित्यिक व पत्रकार अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारामुळे त्यांना  रुग्णालयात दाकल करण्यात आलं होतं , परंतु नंतर अखेरच्या काळात ते घरीच होते,दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 78 वर्षांचे होते, पुण्यातील पत्रकार नगर येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल अवचट यांनी १९६९ मध्ये आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.

डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते, परंतु त्यांनी कधीच व्यावसायिक पत्रकारिता केली नाही. ते नेहमीच समाजातील गरिब-उपेक्षित घटकांसाठी झटले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मोलाचे समाजकार्य केले आहे. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive