By  
on  

लय भारीच Solution ! रितेश-जिनिलियाचा हा भन्नाट व्हिडीओ पाहा

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं जातं. दोन मुलांसोबत त्यांचा सुखी संसार सुरु असल्याचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं. दोघंही भन्नाट आहेत, याची प्रचिती वेळेवेळी सोशल मिडीयावर येते. 

नेहमीप्रमाणेच एक भन्नाट व्हिडीओ रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. यात रितेशच्या बाजूला जिनिलिया बसलीय, ती सांगते ऐका ना माझं इंटरनेट काम करत नाहीय.. तेव्हा रितेश तिला सांगतो, तोंडाने कनेक्ट कर म्हणजे बरोबर कनेक्ट होईल आणि एकच हशा पिकतो. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

 हा व्हिडीओ रितेशच्या अकाऊंटवर शेअर होताच व्हायरल झाला आहे.  हजारोहुन अधिक लाइक्स या व्हिडीओला मिळत आहेत. चाहते लाईक्सचा वर्षाव या व्हिडीओवर करतायत. 

दरम्यान रितेश देशमुख मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवतोय तर त्याची पत्नी जिनिलिया या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण करतेय. वेड असं त्यांच्या महत्त्वकांक्षी सिेनेमाचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच या सिनेमाची घोषणा झालीय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive