By  
on  

प्रसिध्द दिवंगत अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या पत्नी सुशीला मांढरे यांचे निधन

मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या पत्नी सुशीला मांढरे यांचे  ३१ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले आहे. सुशीला मांढरे या ९५ वर्षांच्या होत्या. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे या दोन्ही भावांनी मराठी चित्रपट सृष्टीतला एक काळ आपल्या अभिनयाने गाजवला आहे. ध्रुव या चित्रपटात सूर्यकांत मांढरे यांनी वयाच्या 12 व्या वर्षी बालकलाकार म्हणून झळकले होते. बहिर्जी नाईक या सिनेमातही त्यांनी बाल शिवाजींची भूमिका साकारली होती.

२६ डिसेंबर १९४७ साली सूर्यकांत मांढरे यांचे सुशीला पिसे यांच्यासोबत लग्न झाले. अभिनयाच्या चढ उतारात त्यांच्या पत्नीने त्यांना मोलाची साथ दिली. सूर्यकांत मांढरे हे अभिनयासोबतच उत्कृष्ट चित्रकार म्हणून ओळखले जात.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive