By  
on  

अभिनयातला देव हरपला, रमेश देव यांच्यावर गुरुवारी होणार अंत्यसंस्कार

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने रमेश देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांना धिरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश देव यांच्या निधनाने संपू्र्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठीसोबतच हिंदीतही त्यांनी आपल्या अभिनयाने स्थान निर्माण केले होते. सदाबहार अभिनेते म्हणून ते ओळखले जायचे. 

रमेश देव यांच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची बातमी देव कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली.सकाळी साडे दहा ते दीड वाजेपर्यंत जुहू वर्सोवा येथे त्यांच अंत्यदर्शन घेतला येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive