By  
on  

Live Update : महेश मांजरेकर यांनी घेतलं ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं अंत्यदर्शन

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने रमेश देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांना धिरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश देव यांच्या निधनाने संपू्र्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.रमेश देव यांच्यावर दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेते रमेश देव यांचं अंत्यदर्शन घेण्याची सोय जुहू वर्सोवा लिंक रोड येथे करण्यात आली आहे. मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांची त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रीघ लागली आहे. 

सिनेसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांनीसुध्दा ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

 

अंजिंक्य देव यांचं सांत्वन करताना महेश मांजरेकर. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive