'गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृीतीविषयी नवी माहिती समोर आली आहे. . 8 जानेवारीपासून लतादीदींवर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ९२ वर्षांच्या लतादीदींना करोनाची लागण झाली आहे.तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लतादीदींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक मोठी टीम लतादीदींवर 24 तास सतत निगराणी ठेवत आहे.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी म्हणाले, लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
लतादीदींची प्रकृती सुधारावी यासाठी जगभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. दीदींना बरे वाटावे यासाठी अयोध्येत महामृत्युंजय मंत्राचा जप आणि होमहवन करण्यात आले आहे. सारेगमपच्या टीमनेही पूजा ठेवली होती.
Veteran singer Lata Mangeshkar's health condition has deteriorated again, she is critical. She is on a ventilator. She is still in ICU and will remain under the observation of doctors: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital
(file photo) pic.twitter.com/U7nfRk0WnM
— ANI (@ANI) February 5, 2022
यापूर्वी लतादीदींच्या प्रकृतीवरुन सोशल मिडीयावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मध्यंतरी या अफवांचं बरच पेव फुटलं होतं. त्यामुळे दीदींच्या अधिकृत हॅण्डलवरुन त्यांच्या आरोग्याची माहिती कुटुंबियांनी देण्यास सुरुवात केली आहे.